portrait phule
परिचय

महात्मा ज्योतीराव फुले हे या देशातील एक महान शिक्षणतज्ञ होते. प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक झाले पाहिजे अशी मागणी १३० वर्षापूर्वी देशात सर्वप्रथम करणारे द्रष्टे महात्मा होते.

ज्योतीराव व सावित्रीबाईंनी पुण्यात प्रथम सर्व समाजातील मुलींसाठी आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींच्या मुलांसाठी शाळा सुरु केल्या. त्यांनी दोन शिक्षणसंस्था स्थापन केल्या होत्या. १) नेटीव्ह फिमेल स्कूल्स इन पुणे, २) दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अॅण्ड अदर्स या दोन संस्थांच्या वतीने त्यांनी मुली व मुले यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. ते फक्त संस्थाचालक नसून द्रष्टे शिक्षणतज्ञ होते. याचे पुरावे पुराबिलेखागारात उपलब्ध आहेत. १८४८ साली त्यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. नंतर अहिल्याश्रमात अनुसूचित जातीच्या मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले,शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। अधिक...

ravi-chaudhary
आमची भूमिका

हि वेबसाईट श्री.रवी चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे.

हि वेबसाईट बनविण्यामागे त्यांचा हेतू आहे कि,समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची पुरेपूर माहिती सर्वाना मिळावी. या वेबसाईट मध्ये महात्मा फुले आणि त्यांच्या आयुष्यातील घडामोडी यांची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

श्री.कृष्णकांत कुडले व श्री.हरी नरके यांनी त्यांच्या अमूल्य सूचना व सल्ला हि वेबसाईट बनविताना दिल्या आहेत. श्री.हरी नरके यांनी सांगितले आहे कि हि वेबसाईट महात्मा ज्योतीराव फुले यांच्या महान कायार्वर संशोधनासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल.

" विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। "